Monday, December 24, 2007

आजच...

My first blog entry written in Marathi...

कालपर्यंत सगळं ठीक होते मग आजच असे काय झालं?
विचारांच्या वारयांच असे वादळात रूपांतर का झालं?

कालपर्यंत एकटेपणाच्या जाणीवा प्रकर्षाने जाणवायच्या
जुन्या आठवणी काढता काढता डोळ्यांच्या कडा पाणवायच्या

मग मी ठरवलं फारसा विचार करायचा नाही
मनालाही बजावले की 'त्या' वाटेला जायचेच नाही

पण शेवटी मनच ते, माझे कुठे ऐकणार होतं
त्याला जे हवं तेच ते करणार होतं

अखेर व्हायचं तेच झालं...
माझ्या नकळत माझं मन आनंदी राहू लागलं
माझ्या संमतीशिवाय माझ्या सुखाची दिवास्वप्नं पाहू लागलं

तुम्ही म्हणाल मग यात बिघडले तरी कुठे?
सगळं तर ठीक चाललय मग घोडं अडलं तरी कुठे?

खरं सांगायचं तर खूष राहण्याची सवयच नाही राहिली
गेले काही दिवस या डोळ्यांनी दु:खच जवळून पाहिली

आज ध्येय, वाटा नविन, जिद्दसुद्धा नवी आहे
पुढे जाताना कुणाचीतरी सोबतही हवी आहे

सोबतीचं म्हणाल तर ती सुटण्याची शक्यताही मोठी आहे
प्रत्येक साथ जन्मभरासाठी असते ही समजूतच मूळी खोटी आहे

असं म्हणतात की दुधानं तोंड पोळले तर ताकही फुंकून फुंकून प्यावं
पण तरीही वाटतं की अंधारलेल्या या आयुष्यात त्यानं 'मित्र' बनून यावं

-शुभदा

3 comments:

Achyut Telang said...

Hi Shubhada!
I didnot know you have your blog too. Saw it from your comment on Vikalp's page. It was wonderful to read in Marathi though it is my mother tongue but since I have lived in Gujarat, I haven't actually learnt it & it wasn't a subject in school etc, but I can read it & you wrote wonderfully well!
I started my blog last year!!

Shubhada Rajam said...

Thanks Achyut :-)I never knew Marathi is your mother tounge.Glad you liked it.

Achyut Telang said...

Infact I am reading all of your other posts now & it's one of the best blogs I have come across. You should submit it to Google and other search engines etc if you haven't already. I mostly get my visitors from Google.
Great job! Keep it going!